अरे देवा! मुंबईकर कोरोनापाठोपाठ अजून एका आजाराच्या विळख्यात

 

मुंबई। शहरात कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिक गडद होताना दिसत आहे. अशात देशातील कोरोनाचे नवे हाॅटस्पाॅट बनलेल्या शहरातील नागरिकांच्या अडचणी मात्र काही केल्या कमी होण्याच्या मार्गावर नाहीत.

पावसाच्या वातावरणात ‘लेप्टोस्पायरोसीस’ या आजाराचा धोका बळावण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्याशी संबंध आला किंवा पायावर जखमा असलेल्या व्यक्ती पावसाच्या पाण्यात वावरल्यास त्यांना ‘लेप्टो’ या आजाराचा धोका बळावू शकतो.

अशा रुग्णांवर २४ ते ७२ तासात वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इ. लक्षणे लॅप्टो आजारात सहसा आढळून येतात.

बाधित रूग्णांना तातडीने उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोकाही या आजारात आहे. दरम्यान, लेप्टो या आजाराचा विषाणू उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इ. प्राण्यांच्या शरीरात सहसा आढळतो.

नाक आणि तोंडावाटे हा विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. मुख्य म्हणजे माणसापासून या विषाणूचा संसर्ग पसरत नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.