अरे देवा! माणसांनंतर आता कुत्र्यालाही झाला कोरोना; आरोग्य विभागाने दिले मारून टाकण्याचे आदेश

अटलांटा। कोरोनाने जगभरात चांगलाच थैमान घातला आहे. आतापर्यंत तबब्ल १ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आता माणसांबरोबर प्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एक कुत्रा आढळला आहे. असे सांगितले जात आहे की, कोरोनाची लागण झालेला हा दुसरा कुत्रा असावा.

जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “सहा वर्षीय मिश्र जातीच्या कुत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.

याआधी त्याच्या मालकास कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर कुत्र्याची चाचणी करण्यात आली”. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्याला ठार मारण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कुत्र्याला न्यूरोलॉजिकल नावाचा रोग झाला होता. या रोगाचा आणि कोरोनाचा काहीच संबंध नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यात उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे पाळीव प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी आहे”, असे सांगण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.