Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! पदाधिकाऱ्यांनी दिला थेट सामूहिक राजीनामा, केले ‘हे’ गंभीर आरोप

uddhav thackeray

Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणातील उलथापाथीनंतर प्रचंड घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के बसतच आहेत. आता चंद्रपूर जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटात अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सतत ये जा सुरू आहे. यातच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सामूहिक राजीनामा पाठवला आहे. या सामूहिक राजीनाम्याने ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पक्षाचे कार्य करण्यासाठी जे सक्षम नाहीत त्यांना काढण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे हे या सामूहिक राजीनाम्याविषयी बोलताना म्हणाले. त्यातूनच हे राजीनाम्याचे नाट्य घडले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी आणि वरोरा तालुक्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागच्या वर्षी शिवसेना तालुका प्रमुखपदी नरेंद्र नरड यांना नेमण्यात आले होते. परंतु, त्यावेळी शिवसेना सत्तेत असतानादेखील कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यात कुणीही मदत करायला तयार नव्हते. संघटन वाढीसाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठ पदाधिकऱ्यांनी आमच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले, असा आरोप करत आपल्या पदाचा सामुहिक राजीनामा सादर करण्यात आला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रचंड उलथापालथी झाल्या. शिवसेनेचे दोन गट पडून खरी शिवसेना कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला असतानाच शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आले.

ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. मात्र, अजूनही दोन्ही गट आपल्याकडेच जास्त संख्या असून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे दोन्ही गटाला आपला पक्ष मजबूत करण्याची गरज असताना आता ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी हा सामूहिक राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Nayantara : आई होऊन काही दिवसच झाले की नयनतारावर आलं मोठं संकट, कोसळला दुखाचा डोंगर
Anusha Dandekar : काय सांगता? लग्नाआधीच आई झाली ‘ही’ मराठी अभिनेत्री, बापाचे नाव ऐकून धक्का बसेल
रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट ‘एवढ्या’ रुपयांनी महागले, सणासुदीला नागरिकांना रेल्वेचा धक्का

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now