मुलगा IFS अधिकारी, मुलगी STI, सामाजिक संदेश देत केले ‘अशा’ पध्दतीने लग्न

लग्न म्हटले की अनेकजण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. यामध्ये काहींची परिस्थिती देखील नसते मात्र कर्ज काढून केवळ मोठीपणा दाखवण्यासाठी खर्च केला जातो. परंतु याला काहीजण अपवाद आहेत. पैसे असूनही काहीजण सामाजिक संदेश देत पैसे खर्च करत नाहीत.

असाच एक लग्नाचा आदर्श अहमदनगर जिल्ह्यातील यूपीएससी परीक्षा पास होऊन IFS अधिकारी झालेले चंद्रशेखर परदेशी आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या शुभाली परिहार यांनी समोर ठेवला आहे. त्यांनी गाजावाजा न करता अत्यंत सध्या पद्धतीने रजिस्टर लग्न केले आहे.

वर हा IFS अधिकारी आणि वधू STI अधिकारी आहे. अनेकवेळा असे होते की आई-वडील आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी मोठा खर्च करतात, परंतु शिक्षणात खर्च करत नाहीत. त्यामुळे रजिस्टर पद्धतीने लग्न करुन शिक्षणासाठी खर्च करण्याचा संदेश समाजाला द्यायचा, असा निर्णय त्यांनी घेतला.

या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदामध्ये चिखली गावातील चंद्रशेखर परदेशी हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. पुण्यात इंजिनिअरिंग केल्यानंतर. स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला. मन लावून अभ्यास केला आणि 2018 साली सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाला. चंद्रशेखर परदेशी हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात आयएफएस अधिकारी आहेत.

शुभाली परिहारचा यांचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात चालबुर्ग हे गाव. त्यांनी देखील पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करुन पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. शुभाली परिहार या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

दोघांचे लग्न जमल्यावर दोघेही एकाच गोष्टीवर ठाम होते, ते म्हणजे दोघेही साध्या पद्धतीने लग्न करायचे असे म्हणत होते. लग्नाऐवजी शिक्षणावर खर्च करायचा संदेश आपण द्यायचा असे त्यांनी ठरवले. त्यांनी साध्या पध्दतीने लग्न करून एक चांगला संदेश दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.