Share

केबीसीच्या नावाखाली ९० लाखांचा फ्रॉड, ‘ही’ युक्ती वापरून नागरिकांना गंडवायचा, वाचूुन अवाक व्हाल

KBC-scam

ओडिसा(Odissa) राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौन बनेगा करोडपतीच्या(KBC) जॅकपॉटचे बक्षीस देण्याच्या नावाखाली लोकांची तब्बल ९० लाखांची फसवणूक केली आहे. सीआयडीने(CID) या आरोपीला ओडिसामधून अटक केली आहे. २०१८ मध्ये सीआयडी रांचीच्या सायबर सेलमध्ये फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.(odissa 90 lakh fraud under the name of KBC)

त्यानंतर या प्रकरणाच्या सीआयडीने आरोपीचा तपास सुरु केला होता. ९० लाखांची सायबर फसवणूक करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी ओडिसामधून अटक केली आहे .या आरोपीचे नाव जन्मजय दास (४४) असे आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि एक आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपीने याआधी छत्तीसगड आणि डेहराडून या ठिकाणी देखील लोकांची सायबर फसवणूक केली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना सायबर एसपी कार्तिक एस यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगाराला ओडिसा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कोडरमा जिल्ह्यातील प्रभू महतो यांनी रांची येथील सायबर पोलीस ठाण्यात आरोपी जन्मजय दास याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.या आरोपीने कौन बनेगा करोडपतीचे जॅकपॉट बक्षीस मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची ९० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी विविध व्हर्च्युअल नंबरवरून लोकांना इंटरनेट कॉल करायचा आणि त्यांना केबीसी जॅकपॉटमध्ये विजेता झाल्याचे सांगायचा. केबीसीमध्ये पुढे खेळण्यासाठी अधिक पैसे जिंकण्यासाठी आरोपी लोकांना प्रश्न विचारायचा. यानंतर जिंकलेले पैसे मिळवण्यासाठी जीएसटी आणि इतर चार्जेसच्या नावाखाली लोकांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगायचा.

अशा माध्यमातून या आरोपीने लोकांची तब्बल ९० लाखांची फसवणूक केली आहे. केबीसी जॅकपॉटच्या नावाने तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी मोबाइल क्रमांकावर शेअर करू नका, असे आवाहन सीआयडीने लोकांना केले आहे. असा सायबर फसवणुकींपासून लोकांनी सावध राहावे, असा इशारा सीआयडीने दिला आहे.

केबीसीच्या नावाने कोणत्याही प्रकारचा कॉल आल्यास, केबीसीच्या कार्यालयात किंवा वेबसाइटवर जाऊन नंबर तपासा. लॉटरीच्या नावाने येणाऱ्या कॉलला बळी पडू नका आणि कोणत्याही अनोळखी खात्यात पैसे जमा करू नका, असा सूचना सीआयडीने लोकांना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘पळून जायला गाड्या कसल्या पाठवताय शस्त्रे पाठवा’, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला ठणकावले
..पण ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते, अमृता फडणवीसांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
पेट्रोल, डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले; आजचे भाव वाचून तुमचेही डोके चक्रावेल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now