ओडिशामधील(Odisaa) भुवनेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय व्यक्तीने तब्बल १० राज्यांमधील २७ महिलांसोबत लग्न(Marriage) केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. या व्यक्तीने पीडित महिलांची पैशांची देखील फसवणूक केली आहे.(odisaa frau man bibhu praksh svain)
या आरोपीचे नाव बिभू प्रकाश स्वैन असे आहे. बिभू प्रकाश स्वैन हा ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यातील पाटकुरा या परिसरातील रहिवासी आहे. आरोपी बिभू स्वैनने वेगवेगळ्या १० राज्यांतील २७ महिलांशी लग्न केले आहे. यापूर्वी आरोपी बिभू स्वैनने बँकांची(Bank) देखील फसवणूक केली आहे. २००६ मध्ये त्याने केरळमधील १३ बँकांची १ कोटी रुपयांची १२८ बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक केली होती.
आरोपी बिभू स्वैनने हैदराबादमध्ये प्रतिष्ठित कॉलेजात मुलांना जागा मिळवून देतो, असे लोकांची २ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. आरोपी बिभू स्वैनने २७ उच्च पदांवर काम करणाऱ्या महिलांशी लग्न केले आहे. यामध्ये छत्तीसगडच्या चार्टर्ड अकाउंटंट, नवी दिल्लीतील शाळेतील शिक्षक आणि आसाममधील तेजपूर येथील डॉक्टर यांचा समावेश आहे.
तसेच आरोपीने दिल्ली उच्च न्यायालयाचे दोन वकील, इंदूर येथील सरकारी कर्मचारी, केरळमधील उच्चपदस्थ महिलांसोबत लग्न केले आहे. याकरिता आरोपीने jivansathi.com आणि bharatmatrimony.com यांसारख्या विवाह जमवणाऱ्या साइट्सचा वापर केला आहे. या महिलांना फसवताना आरोपीने स्वतः प्राध्यापक असल्याचे सांगितले.
आरोपीने आपण शिक्षण आणि प्रशिक्षण उपमहासंचालक पदावर काम करत असल्याचे पीडित महिलांना सांगितले. तसेच वार्षिक उत्पन्न ५० ते ७० लाख असल्याचे पीडित महिलांना सांगितले होते. सध्या NEET UG आणि PG प्रवेश परीक्षांचे मुख्य नियंत्रक म्हणून काम करत असून आपण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या सुशिक्षित महिलेच्या शोधात आहे, असे त्याने विवाह जमवणाऱ्या साइट्सवर नमूद केले होते.
आरोपीचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. आरोपीने पीडित महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत मोठा सापळा रचला. आरोपीने पीडित महिलांकडून पैसे उकळले. आरोपीने पैशांसाठी पीडित महिलांना फसवले. १९८२ मध्ये आरोपीचे पहिले लग्न झाले होते. २००२ ते २०२० या काळात आरोपीने इतर महिलांशी लग्न केले. सध्या आरोपी त्याच्या शेवटच्या पत्नीसोबत राहत होता, असे पोलिस उपायुक्त उमाशंकर दास यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
बिल गेट्स यांची आणखी एक भविष्यवाणी, जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार
रणवीरपासून ते सिद्धार्थपर्यंत या कलाकारांना मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’, वाचा संपुर्ण यादी
“भ** शब्दाचा अर्थ संजय राऊतांना कळतो का?, माझ्या बायको आणि आईला….”; किरीट सोमय्या कडाडले