ओडिशा राज्यातील दक्षता पथकाने एका वरिष्ठ अभियंत्याच्या घरावर छापा टाकला आहे. यामध्ये दक्षता पथकाने वरिष्ठ अभियंत्याच्या(Engineer) घरातून रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत. ओडिशा दक्षता पथकाने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमध्ये दक्षता पथकाने १.३६ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १.२ किलो सोने जप्त केले आहे.(odisa pwd engineer home police raid)
कारवाई करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आशिष कुमार दास असे आहे. आशिष कुमार दास ओडिशातील मलकानगरीमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात वरिष्ठ अभियंता आशिष कुमार दास यांना दक्षता पथकाने ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी आशिष कुमार दास एका बँकेच्या व्यवस्थापकाला दहा लक्ष रुपये देण्यासाठी निघाला होता.
त्यावेळी दक्षता पथकाने कारवाई करत त्याला अटक केली. त्यानंतर दक्षता पथकाने आशिष कुमार दास यांची चौकशी केली. या चौकशीअंतर्गत दक्षता पथकाने आशिष कुमार दास यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले. त्यामध्ये वरिष्ठ अभियंता आशिष कुमार दास यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे.
ग्रामीण बांधकाम विभागात वरिष्ठ अभियंता या पदावर काम करणाऱ्या आशिष कुमार दास यांच्याकडे बँक एफडी, बचत, विमा इत्यादींच्या रूपात ४ कोटींची मालमत्ता आहे. तसेच दक्षता पथकाने टाकलेल्या छाप्यात दास यांनी काही वस्तूंमध्ये रोख रक्कम, सोन्याची नाणी, दागिने लपवल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय वरिष्ठ अभियंता अभियंता आशिष कुमार दास यांच्या कुटूंबाच्या नावे अनेक घरे आणि जमीन देखील सापडली आहे. दक्षता पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आशिष कुमार दास यांची अनेक बँक खाती आणि २ बँक लॉकर्सची पडताळणी केली जात आहे. या वरिष्ठ अभियंत्याच्या इतर मालमत्तांची देखील चौकशी केली जात आहे.
मालमत्तेची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे दक्षता पथकाने सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून आशिष कुमार दास यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर दक्षता पथकाकडून छापेमारी सुरु आहे. आतापर्यंतच्या दक्षता पथकाच्या तपासात दास आणि त्यांच्या कुटूंबियांच्या नावे १२ बँक खाती आढळून आली आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
“शरद पवारांचं सर्व आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे”, सदाभाऊंची सडकून टीका
विदेशातही पेटला हिजाब वाद, हिजाब घातलेल्या महिलेला एन्ट्री दिली नाही म्हणून रेस्टॉरंट केले बंद
बाबो! सरकारी शाळेतील शिक्षक निघाला 35 कॉलेज, 2 बंगल्यांचा मालक; संपत्ती पाहून अधिकारीही हैराण