खाद्य तेलात ‘अशा’ प्रकारे बदल करुन टाळा लठ्ठपणा; तज्ज्ञांचा सल्ला

दिल्ली । सध्या देशात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. देशातील लोक अलीकडच्या काळात लठ्ठ होत चालले आहेत. भारत हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र आता तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

भारतातील तरुणांमध्ये कोलेस्टेराॅल सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. २० ते २९ वयोगटातील तरुणांचे वजन वाढत आहे. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना होत आहे. कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर यावर उपाय आहेत.

आपण खात असलेले खाद्य तेल दर महिन्याला बदलणे हा यावर एक चांगला उपाय आहे. शेंगदाना तेल, करडीचे तेल, सूर्यफुल तेल, अशा प्रकारे दर महिन्याला वेगवेगळे तेल वापरावे, असे अनेक डाॅक्टरांनी सांगितले आहे.

दिल्लीतील गंगाराम हाॅस्पिटलमध्ये याबाबत संशोधन करण्यात आले आले आहे. या संशोधनात तेलाबाबत ही सोपी पद्धत समोर आली आहे. कोलेस्टेरॉल हे चरबीचेच एक रुप असून ते रक्तामध्ये जमा होत असते आणि त्याचा अतिरेक झाला की ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला चिकटते.

त्याचे थर वाढत गेले की ते रक्तप्रवाहात आडवे येतात आणि रक्तप्रवाह बंद होऊन हृदय बंद पडू शकते. यावर खाद्य तेेलात बदल करणे हा सोपा उपाय आहे. लोकांनी तो केला पाहिजे. असेही या तज्ञांनी सांगीतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.