‘ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर …’

मुंबई : रविवारी जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून, लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नॉन क्रिमीलियरची अट रद्द करावी यासह इतरही अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

‘ओबीसींच्या आरक्षणास धक्का लागत असेल तर ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा देतानाच ओबींसींच्या जनगणनेसाठी  केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करणार असून, तसे न झाल्यास आपण स्वत: तसा ठराव विधानसभेत मांडू, अशी ग्वाही  मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

रविवारी जालना शहरात ओबीसी समन्वय समितीच्यावतीने  मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा आहे,’ असे देखील वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, ‘ओबीसींची जनगणना करणे ही प्रमुख मागणी असून, त्यासाठी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र तक्ता ठेवावा जेणेकरून विस्थापित असलेला समाज नेमका  किती आहे, हे कळून आरक्षण देण्याच्या विरोधात नाही, परंतु आमच्या आरक्षणातून वाटा मागत असतील तर ही बाब चुकीची असून, त्यावेळी मात्र आम्ही गप्प बसणार नाही,’ ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”
अजित पवार गरजले; ‘माझ्या बारामतीत सावकारी चालणार नाही, अन्यथा…’
विराट आणि अजिंक्यमध्ये कर्णधारपदासाठी टक्कर? अजिंक्यने दिलेले उत्तर वाचून कौतुक कराल  

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.