‘ओ नारी मनहारी, सुकुमारी…’ प्रिया बापटचा मनमोहक रील व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

मुंबई। आजकाल सोशल मीडियावर अनेक नवनवीन गाण्याचे, फॅशनचे तसेच डान्सचे ट्रेंड पाहायला मिळत आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक सक्रिय असतात. दिवसाला हजारो व्हिडिओ किंवा फोटोज हे नेटकरी पोस्ट करतात.

अशातच आता अनेक कलाकार देखील डान्स किंवा गाण्याचे अनेक ट्रेंड फॉलो करत असतात. सध्या ‘ओ नारी मनहारी, सुकुमारी … ‘ गाण्याचा जबरदस्त ट्रेन्ड सुरु आहे. या गाण्यानं अनेकांना वेड लावलं आहे.

बरेचसे सेलेब्रिटी आणि युजर्स या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहेत. याच गाण्यावर आता अभिनेत्री प्रिया बापटनेसुद्धा यावर रील बनवत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे ‘ओ नारी मनहारी सुकुमारी… ‘या ट्रेंडिंग गाण्यावर बनवलेला सुंदर रील आहे. यामध्ये प्रिया हिरव्यागार काठपदर साडीमध्ये दिसून येत आहे. तिच्यावर हे गाणं अगदी शोभत आहे.

प्रिया या व्हिडीओमध्ये पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिचे कानात घातलेले झुमके अजून खुलून दिसत आहेत. या आकर्षित व्हिडिओने सर्वांना भुरळ पडली आहे. प्रिया बापट ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेक आपले फोटोज व व्हिडिओज आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

प्रिया बापट तिच्या फिट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रिया बापट हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. प्रिया आणि उमेश कामत यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रिया आणि उमेश यांनी २०११ साली लग्नगाठ बांधली होती. हे दोघ अनेक चाहत्यांची आवडती जोडी आहे.

हे दोघंही आपले अनेक व्हिडिओज आपल्या चाहत्यांसाठो पोस्ट करत असतात. अशातच आता सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं साधन बनलं असल्याने अनेक जण यावर भन्नाट व्हिडिओ पोस्ट करत असतात. याआधीही अनेक गाणी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत.
महत्वाच्या बातम्या
किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हसन मुश्रीफ संतापले 
‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत जरी मारली’…चंद्रकांत दादांच्या वक्तव्याने शिवसेना खवळली? 
ठाकरे सरकारच्या डर्टी ११ मध्ये मंत्री हसन मुश्रीफही, १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
मगरीचे पोट कापल्यानंतर शिकारी झाला सुन्न; ६००० वर्ष जुना ‘खजिना’ मिळाला…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.