Share

मित्रांच्या मिठीत काजोल-अजय देवगणची लेक झाली बेफाम; लोकं म्हणाली १९ व्या वर्षी हे काय चाललय

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणने तिच्या मित्रांसोबत नवीन वर्षाची पार्टी साजरी केली. यादरम्यान न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.  बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.

नवीन वर्षाच्या निमित्ताने न्यासा देवगणने तिच्या मैत्रिणींसोबत रात्रभर न्यू इयर पार्टीला धूम ठोकली. न्यासा देवगनच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे तिचा मित्र ओरहान अवत्रामणी (ओरे) ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मित्रमंडळीसोबत बेधुंद होऊन पार्टीत मजा करतांना दिसत आहे.

नेहमीच मुलींनी वेढलेली ओरी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. ओरी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. न्यू इयर पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

 

काही काळापासून ओरी आणि न्यासा सतत एकत्र दिसत आहेत. प्रत्येक पार्टीत न्यासा आणि ओरीची धमाल पाहून लोकांना वाटते की ओरी जान्हवी कपूरपासून दूर गेली आहे. एका पार्टीत तिचा डीप नेकलाईन असलेला काळा ड्रेस नेटकऱ्यांना मात्र आवडलेला नाही. 

न्यासाचा हा लूक फॅशन जगात अगदी योग्य आहे परंतु वयाच्या १९ व्या वर्षी हा लूक नेटकऱ्यांना मात्र मान्य नाही. हीच काय सुरुये?, पार्टीच करते मग शिकणार कधी? असे नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. 

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now