कोरोना योद्ध्याला सलाम! पाठीवर बाळ, हातात कोरोना लसींचा बॉक्स आणि कमरेपर्यंत नदीचे पाणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी कोरोना योद्धे दिवसरात्र काम करताना दिसून येत आहे. या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे झालेल्या हालचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आता असाच एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती महिला लोकांना लस देण्यासाठी किती कष्ट करत आहे, हे दिसून येत आहे. ती तिची जबाबदारी प्रामाणिकपणे पुर्ण करत असल्याने तिचा हा फोटो खुपच व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये एक महिला कर्मचारी सामान्य लोकांसाठी काम करताना दिसून येत आहे. ही महिला हातात व्हॅक्सिनचा बॉक्स, पाठीवर मुल आणि कमरे इतक्या पाण्यातून नदी पार करताना दिसत आहे. लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी ती हे सर्व करत आहे.

कोरोनाच्या काळात अनेक लोकं काळाबाजार करताना दिसून येत आहे. रुग्णांचा जीव जात असतानाही काही लोकांची पैशांची हाव सुटत नाहीये, तर काही लोक जीवाची पर्वा न करता देशासाठी प्रामाणिकपणे काम करताना दिसून येत आहे.

गेल्याही वर्षी अशाच एका महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये रेलू वसावे नावाची अंगणवाडी सेविका चक्क १८ किलोमीटर होडी चालवून बाळांना आणि गर्भवती महिलांना आरोग्य सुविधा देत होती. रेलु या नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे.

तेव्हा रेलू यांच्यावर २५ नवजात शिशु आणि ७ गर्भवती महिलांची जबाबदारी होती, ती रेलू यांना पार पाडायची होती. पण कोरोनाच्या भीतीमुळे स्त्रिया अंगणवाडी यायला तयार नव्हत्या. त्यामुळे रेलू या स्वत: १८ किलोमीटर होडी चालवून त्या महिलांना आणि बाळांना आरोग्य सुविधा देत होत्या.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! लग्नपत्रिकेत नाव नाही छापले म्हणून झाला वाद; मंडपातच पडला रक्ताचा सडा
गृहप्रवेशाआधीच घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार, नवरीने लगावली नवरदेवाच्या कानशिलात
..म्हणून संजय दत्तवर भयंकर चिडले होते सुनील दत्त; घर सोडून जाण्याची दिली धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.