माझ्यापुढे तुझी औकात काय म्हणत नर्सने पोलीसांसमोर डाॅक्टरच्या कानाखाली वाजवल्या; पहा व्हिडीओ

रामपुर | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. देशात फार  गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कोरोना योध्यांमध्येच वाद होण्याच्या घटना समोर येत आहेत.

काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर दोन पोलिसांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका डॉक्टर आणि नर्सच्या वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या रामपुर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी नर्सकडे मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली. यावेळी वरिष्ठ डॉक्टरला सागंण्यास ही नर्स गेली होती. मात्र लेखी लिहून दे असं डॉक्टरने नर्सला सांगितलं.

नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्रासाठी गोंधळ घालत होते. त्यानंतर पुन्हा नर्स डॉक्टरकडे गेली असता नर्स आणि डॉक्टरमध्येच जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात नर्सने तुझी लायकी आहे का असं म्हणत डॉक्टरच्या कानाखाली मारली.

नर्सने कानाखाली मारल्यानंतर डॉक्टरही चांगला संतापला. त्यानेही नर्सला मारहाण केली. हे सर्व घडच असताना त्याठिकाणी पोलिस अधिकारी उपस्थित होता आणि त्यांच्या समोरचं ही घटना घडली आहे. तसेच यावेळी रुग्णालयात अनेक कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सोशल मडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी दोघांची समजुत काढत शांत केले आहे.  रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती, नातेवाईकही होते. त्यामुळे कामाच्या तणावातून ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुमच्या अधिकाऱ्यांवर खुनाचे खटले दाखल केले पाहिजे; हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रीया
‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’
ऑक्सिजन मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्यांची संपत्ती जप्त करा; योगींचे भयानक आदेश

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.