नर्सकडून २ महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण, बाळाचा हात फ्रॅक्चर; सीसीटीव्हीतून झाला खुलासा

कधी कधी अशा भयानक घटना घडत असतात, ज्याचा आपल्याला विचार करणेही शक्य होत नाही. आता अशीच एक माणूसकीला काळिमा घालणारी घटना दिल्लीतून समोर आली आहे. एका नर्सने २ महिन्याच्या बाळाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडला आहे.

दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधून एक व्हिडिओसमोर आला आहे. ज्यामध्ये एका नर्स दोन महिन्याच्या बाळाला मारहाण करताना दिसून येत आहे. ही घटना २४ जूलैला घडली आहे. सीसीटीव्हीतला हा व्हिडिओसमोर आल्यानंतर पोलिसांनी नर्सला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला उपचारासाठी दिल्लीच्या विवेक विहार इथल्या नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. नर्सिंग होममध्ये दिवसातून एकदा त्या बाळाचे वडिल त्याला बघायला यायचे. कारण तिथे थांबण्याची परवानगी त्यांना देण्यात नव्हती आली.

असे असताना २४ जूलै रुग्णालयातून एक फोन आला आणि तुमच्या बाळाला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. तसेच या दुखापतीमध्ये बाळाचा हातही फ्रॅक्चर झाला होता आणि बाळाचा चेहराही सुजलेला होता.

त्यानंतर नर्सिंग होमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करण्यात आले होते. ते पाहून सर्वांना धक्काच बसला. कारण त्या व्हिडिओमध्ये एक नर्स बाळाला मारहाण करताना दिसली. त्यानंतर बाळाच्या वडिल सबीब यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, नर्स २४ जूलैच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास बाळाला मारताना दिसत होती. हा सर्वप्रकार समोर आल्यानंतर सबीबला नर्सिंग होमकडून शांत राहण्याची धमकी देण्यात आली होती. आता बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा हातही फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंनी सांगितले फडणवीसांसोबत पाहणी करण्याचे कारण; म्हणाले, सकाळी मला असे समजले की..
कारगिल युद्धाला जाण्याच्या आधी शहिद विक्रम बत्रा यांनी प्रियसीचा भरला होता रक्ताने भांग; वाचा संपूर्ण प्रेमकहाणी
‘मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे’ – उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.