अलीकडेच काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
याशिवाय, भाजपा दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची माहणी होत होती. प्रेषित पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांना सोशल मीडियावर बलात्कार व हत्येची धमकी मिळाली होती.
अशातच पुन्हा एकदा त्यांनी खळबळजनक खुलासे केले आहे. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये नुपूर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी फोन केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ओपइंडियाच्या युट्यूब चॅनेलवर ३१ मे रोजी मुलाखत अपलोड करण्यात आली आहे.
या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये नुपूर यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला आहे. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला कॉल केला. ते म्हणाले की, काळजी करु नको बेटा आम्ही तुझ्यासोबत आहोत. (Don’t Worry Beta We Are With You. We Are All Here With You)”, असं नुपूर यांनी सांगितले.
दरम्यान, पुढे नुपूर यांनी आपल्याला धमक्या येऊ लागल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी समर्थन दिल्याच देखील सांगितलं आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाकडून आपल्याला समर्थन मिळत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
याबद्दल सांगताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘मी माझ्या वरिष्ठ नेतृत्वाची यासाठी आभारी आहे. हे प्रकरण जास्त वाढल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला होता. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षेबद्दल काळजी करतात,’ असही ते म्हणाले.