NSA अजित डोवाल: इंदिरा गांधी असो किंवा नरेंद्र मोदी, सगळ्यांचे मन जिंकणारा माणूस

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नेहमी चर्चेत असतात. भारतीय सेनेच्या प्रत्येक गुप्त ऑपरेशनमध्ये त्यांचा खुप मोठा हात असतो. त्यांच्या नेतृत्वात भारताने अनेकवेळा पाकिस्तानी सैन्याला किंवा दहशतवाद्यांना धुळ चारली आहे.

त्यामुळेच त्यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की अजित डोवाल भारताचे एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांना किर्ती चक्र आणि शांतीकालमध्ये मिळणाऱ्या गॅलेंट्री अवार्डने सन्मानित केले गेले आहे.

डोभाल अनेक सिक्युरीटी कॅम्पॅनमध्ये सहभागी राहिले आहेत. अजित डोवाल यांचा जन्म १९४५ मध्ये पौडी गढवाल या गावात झाला होता. त्यांचे शिक्षण अजमेरच्या मिलिट्री स्कूलमध्ये झाले होते. सुरूवातीपासूनच ते खुप हुशार होते.

केरळच्या १९६८ बॅचचे आयपिएस ऑफिसर डोवाल आपल्या नियुक्तीच्या ४ वर्षानंतर १९७२ मध्ये इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सामिल झाले होते. त्यांनी आपला जास्तीचा वेळ गुप्तहेर खात्यात घालवला आहे. २००५ मध्ये ते आईबीच्या डायरेक्टर पदावरून रिटायर झाले.

त्यांनी आपल्या पुर्ण करिअरमध्ये फक्त ७ वर्षे पोलिसाची वर्दी आपल्या अंगावर घातली आहे. डोवाल हे मल्टी एजेंसी सेंटर आणि जॉईंट इंटेलिजेंस टास्क फोर्सचे चीफ राहून गेले आहेत. त्यांना गुप्तहेरीचा जवळपास ३७ वर्षांचा अनुभव आहे.

अजित डोवाल हे ३१ मे २०१४ ला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर रूजू झाले होते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की गुप्तहेर संघटना रॉ च्या अंडर कव्हरेज एजंट म्हणून डोवाल सात वर्षे पाकिस्तानातील लाहौर येथे राहिले होते.

ते पाकिस्तानी मुस्लीम बनले होते. जून १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी ऑपरेशन ब्लू स्टार चालवले गेले आणि या ऑपरेशनमध्ये त्यांची महत्वाची भुमिका होती.

अजित डोवाल रिक्शावाला बनून मंदिरात गेले होते आणि मंदिरात असणाऱ्या सगळ्या दहशतवाद्यांची माहिती त्यांनी मंदिराबाहेर असलेल्या भारतीय सेनेला दिली होती. त्यानंतर भारतीय सेनेला या ऑपरेशनमध्ये विजय मिळवला होता.

१९९८ मध्ये कंधार प्लेन हायजॅकच्या वेळेस ऑपरेशन ब्लॅक थंडर चालविण्यात आले होते. तेव्हा अजीत डोवाल दहशतवाद्यांशी निगोसिएशन करणारे मुख्य अधिकारी होते. त्यांनी जम्मू-कश्मीरमध्ये अनेक आतंकवाद्यांना सरेंडर करण्यास भाग पाडले आहे.

अजित डोवाल यांनी ७ वर्षे नॉर्थ-ईस्ट, जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये अंडरकव्हर एजंट म्हणून काम केले आहे. २०१५ मध्ये जेव्हा मणिपुरमध्ये भारतीय सेनेवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यानंतर जी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्या ऑपरेशनचे हेड प्लॅनर अजित डोवाल हे होते.

त्यांनी अनेक खतरनाक ऑपरेशन केले आहेत. त्यांचे किस्से जर तुम्ही ऐकले तर त्यांच्यासमोर जेम्स बॉन्डसुद्धा फिका पडेल. अजित डोवाल यांना मोठे मोठे मंत्रीसुद्धा घाबरतात. त्यांना ज्या ठिकाणी महत्वाची जबाबदारी देण्यात आली त्यांनी ती जबाबदारी खुप उत्तमरीत्या पार पाडली आहे. म्हणूनच ते सगळ्या मोठ्या नेत्यांचे खुप आवडते व्यक्ती आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.