आता तुम्हाला ऑनलाईन मिळेल मतदान कार्ड; जाणून घ्या कशारितीने डाऊनलोड करायचं

देशात २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून डिजीटल मतदान कार्ड जारी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी आपल्याला पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना ऑनलाईन डाऊनलोड करता येत होता. पण आता मतदान ओळखपत्रही ऑनलाईन मिळणार असल्याने आपन घरबसल्या मोबाईलवर, कम्प्युटरवर डाऊनलोड करू शकतो.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते हे डिजीटल मतदान कार्ड जारी करण्यात येणार आहे. मतदान कार्ड आपल्याला पीडीएफच्या स्वरूपात मिळेल. मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या डिजीटल मतदान कार्डावर फोटो, भागक्रमांक, क्युआर कोड, नाव, पत्ता असेल.

२५ ते ३१ जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना मतदान कार्ड मिळणार आहे. त्यानंतर ज्या मतदारांचा मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे त्यांना १ फेब्रूवारीपासून मिळणार आहे.

कसे डाऊनलोड कराल?

www. Voterportal. Eci.gov. in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यावर डाऊनलोड ईपीआयसी यावर क्लिक करून तुम्ही डिजीटल मतदान कार्ड मिळवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणतात अनुभव! अशोक चव्हाणांनी मोठा घोटाळा शोधून मुख्यमंत्र्यांना वाचवले
हसावं की रडावं! सुनेनी केलं भांडण मग सासरा चढला झाडावर; खाली उतरण्यास सांगुनही ऐकेना
महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय
“अली अब्बास जफर तुमची अल्लाहची टिंगल करण्याची हिंमत आहे का?”; कंगणा रणौत

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.