आता वर्क फ्रॉम होम करून महिला कमावू शकतात बक्कळ पैसा; या कंपन्या देतायत ७० टक्के वेतन

मुंबई। गेले वर्षभर देशात कोरोना विषाणूमुळे अनेकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. सर्वसामान्यांसाठी तर कोरोना हे एक मोठं संकट आलं आहे. कारण सामान्य माणसांना कोरोनाशी लढायचं आहे तर दुसरीकडे जर कामावर गेले नाही तर घर कसे चालणार या संकटाशी लढायचं आहे.

अशातच वर्षभरातील वाढत्या कोरोना विषाणूमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या व त्यामुळे घर चालण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे.

अशातच अनेक कंपन्यांनी कर्मचारी कामावर येऊ शकत नसल्याने वर्क फ्रॉम होम हा पर्याय निवडला व अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला व आता हाच पर्याय सर्वाना आवडत आहे. यामुळे कर्मचाऱ्याचे प्रवासाचे कष्ट वाचतात तर कंपन्याचा कार्यालय, कार्यालयाचा मेंटेन्स, वीज, स्टाफ हा खर्च वाचतो आहे.

त्यामुळे आता आयटी क्षेत्रातील महिलांसाठी वर्क फ्रॉम होम या पर्यायामुळे मोठीच संधी निर्माण झाली आहे. सध्या सर्वाधिक नोकरभरती ही आयटी क्षेत्रात होते आहे. एकूण नोकरभरतीमधील ६५ टक्के नोकरभरती ही आयटी क्षेत्रातील आहे. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या अभ्यासानुसार यावर्षी मार्च महिन्यापासून आयटी कंपन्याद्वारे झालेल्या एकूण नोकरभरतीमधील महिला उमेदवारांची संख्या ४३ टक्के आहे.

टीमलीजच्या अभ्यासानुसार मिडल मॅनेजमेंट ते वरिष्ठ पातळीवरील महिलांच्या नोकरभरतीत तेजी आली आहे. आयटी कंपन्यादेखील महिलांना जास्त सॅलरी देत आहेत. कंपन्या महिलांना मोठ्या रकमेच्या सॅलरींचे ऑफर्स देत आहेत. अगदी ७० टक्क्यांपर्यत वाढीव पॅकेज देण्यास कंपन्या तयार आहेत.

त्यामुळे आता सध्या आयटी क्षेत्रात महिलांची फक्त नोकरभरतीच होत नाहीए तर त्यांना पॅकेजमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यत वाढ देखील देण्यात येते आहे. सेकंड करियर महिलांची भरती मोठ्या प्रमाणात केली जाते आहे कारण त्यांची सॅलरी तुलनेने नेहमीच कमी असते. ज्या महिलांना नव्याने करियर सुरू करायचे आहे किंवा नोकरी करायची आहे, अशा महिलांना मोठीच संधी आहे.

त्यातच कोरोनाच्या संकटकाळात महिलांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याबरोबरच कार्यालयीन काम किंवा कंपनीचे कामदेखील उत्तमरित्या सांभाळले आहे. त्यांची कामगिरी चांगलीच आहे. कोरोना महामारीच्या काळात नोकरी गमावण्याच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे.
महत्वाच्या बातम्या
नवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा, वाचून धक्का बसेल
क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणी कामगिरी
सियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू
शाकाहार समजून मांसाहार तर करत नाहीत ना? जाणून घ्या ‘या’ पदार्थांमध्ये आहे मांसाहारी घटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.