धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या बाबतीत राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांना(Loudspeaker) परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.(Now the state government has taken a big decision regarding loudspeaker)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या संदर्भात एक बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान आज राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक देखील उपस्थित राहणार आहेत.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता राज्यातील पोलिसांना सतकर्तेचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या बैठकीत एक दिशानिर्देश तयार करण्यात येणार आहे.”
“येत्या दोन-तीन दिवसांमध्ये यासंदर्भात निर्देश जारी केले जाणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी देखील भोंग्यांच्या बाबतीत महत्वाचे आदेश दिले आहेत.
नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. त्यामुळे नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आता परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, कोणत्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. . याव्यतिरिक्त अजाणाच्या वेळी हनुमान चालिसा लावता येणार नाही. तसेच मुस्लिम धर्मिंयाना देखील मशिदींवरील भोंग्याची पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावरून धर्मा-धर्मात दुही’, भाजपच्या मुंडेंनी स्वपक्षालाच सुनावले
मुलाने भारतासाठी जिंकले पदक, आर माधवनने क्षणाचाही विलंब न करता दिली गोड बातमी, म्हणाला..
धोकादायक कॉम्बिनेशन! अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ पाच गोष्टी, शरीरावर होईल गंभीर परिणाम