एसटी वाहतूकीबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर टाळे बंदीच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, टप्प्याटप्प्याने ती सुरू करण्यात आली.

याचबरोबर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर २० आॅगस्टपासून सामाजिक अंतर राखत आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणे आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन मंडळास परवानगी देण्यात आली होती.

तसेच, आजपासून पूर्ण आसन प्रवासी वाहतूक करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. मात्र प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं मास्क लावणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक असणार आहे.

याचबरोबर प्रवास करताना काही नियम दिलेले आहेत. या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करणे.

दरम्यान, राज्य शासनाच्या नियमानुसार 20 ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यास एसटीला परवानगी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतील खतरनाक व्हिलन संस्कार पंडीत आठवतोय का?

वाढीव वीजबिलावरून मनसेने महावितरणचे कार्यालय फोडले

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.