मुजोर दुकानदारांचे धाबे दणाणले! शिधावाटप दुकानांवर चांगली वागणूक न दिल्यास करता येणार तक्रार

मुंबई : केंद्र शासनाच्या किमान समायिक कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवला जातो. मात्र अनेकदा या दुकानात शिधा पत्रिकाधारकास चांगली वागणूक दिली जात नसल्याचे समोर येते.

परंतु, आता मुजोर दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. याचे कारण असे की, शासनाकडून देण्यात आलेल्या ‘मेरा रेशन’अॅपद्वारे माहिती मिळवण्याची व तक्रार करण्याची सुविधा होत असल्यामुळे शिधावाटप दुकानांवरील वॉच आता अधिक कडक करण्यात येत आहे.

शिधा पत्रिकाधारकास चांगली वागणूक न दिल्यास संबंधित दुकानाची तक्रार ‘मेरा रेशन’अॅपद्वारे करता येणार असल्याने शिधावाटप दुकानदारांना लाभार्थींना सौजन्यशील वागणूक द्यावी लागणार आहे. दरम्यान, अॅपद्वारे तक्रार करून दुकानदारांस वेठीस धरण्याच्या घटना वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

शिधापत्रिकाधारकास ‘मेरा रेशन’ या ॲपवर एका क्लिकवर अन्नधान्य किती आले, त्यातून किती वाटप झाले, कार्ड अधिकृत आहे की नाही, अन्नधान्य, किराणा माल स्वस्त व माफक दराने वितरित होत आहे की नाही आदींची माहिती देखील मिळणार आहे.

आता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात उपलब्ध होणार धान्य…
वन रेशन वन रेशन कार्ड नंतर केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे मोबाइल अॅप लाँच केले आहे. Mera Ration mobile app असे या अॅपचे नाव असून ते गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

हे अॅप डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्ड संबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या अॅपवर गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या 

आधी वडील वारले, नंतर आईनेही आत्महत्या केली; तरीही हिंमत न हारता बनला पोलीस

वडील वारले, आईने जाळून घेतले, त्यांच्या मुलाला एका डाॅक्टरने सांभाळत बनवले पोलीस अधिकारी

मी नाही सुशांतनेच मला सोडलं, अंकिता लोखंडेने केला सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.