आता भारतावर अणूबॉम्ब टाकू; भेकड पाकड्यांची भारताला धमकी

इस्लामाबाद | जगात पाकिस्तान आणि भारताचे वाद साऱ्या जगाला माहिती आहेत. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला धमकी दिली आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अहमद यांनी भारताला थेट अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.

आता भारतासोबत छोटं युद्ध होणार नाही, तर थेट अणूबॉम्बनेच हल्ला करण्यास पाकिस्तान सज्ज असल्याचं रशीद अहमद यांनी सांगितलं. याआधीही शेख रशीद अहमद यांनी भारताविरोधात अनेकदा गरळ ओकली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेख रशीद यांनी जागतिक राजकारणावरही भाष्य केले. चीनच्या विरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटन हे देश उभे आहेत. तर, चीन नवा मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण, रशिया या देशांसोबत एकत्र येत आहे. पाकिस्तानलाही चीनसोबत उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास छोटी लढाई, युद्ध वगैरे होणार नाही. आता थेट शेवटची लढाई होईल. पाकिस्तानचे शस्त्र अगदी योग्य ठिकाणी हल्ला करण्यास सक्षम आहे. पाकिस्तान भारताच्या आसामपर्यंतही हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यामुळे भारतासोबत आता थेट अणूयुद्धच होईल, असा इशारा रशीद यांनी भारताला दिला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.