मोठी बातमी! आता १० वी मध्ये ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेज बंद असून, अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोना काळात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता अनुसूचित जातीतील १० विच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहेत.

अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे.

तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे. अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

कुत्र्यावर इतका भयानक अत्याचार; व्हिडिओ पाहून जॉन अब्राहमची पण उडाली झोप

ओ तेरी! महिलेनं घातलं 264 झूम मिटिंगला एकच शर्ट, पण शेवटच्या दिवशी झालं असं की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.