सध्या ईडीकडून राजकीय पक्षातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांची यांची अलिबाग(Alibagh) मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं होतं. या कारवाईची मोठी चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून शेतकऱ्यांवर देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.(Now farmers also have to pay income tax)
केंद्रीय तपास यंत्रणांची आता अतिश्रीमंत शेतकऱ्यांवर नजर असणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अतिश्रीमंत शेतकऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्यांची देखील छाननी केली जाणार आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून ही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे अतिश्रीमंत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त आहे, अशाच शेतकऱ्यांची माहिती आयकर विभागाच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. १९६१ मध्ये शेतीचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं होतं. यासंदर्भात कायदा देखील करण्यात आला होता. पण सध्या शेतकऱ्यांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
नुकतंच तेलंगणामधील शेतकऱ्याने करमुक्त कायद्याचा गैरफायदा घेतल्याचं एक प्रकरणं समोर आलं होतं. यावेळी शेतकऱ्याने त्याचं उत्त्पन्न नऊ लाख रुपये दाखवलं होतं. यानंतर आयकर विभागाने तातडीने कारवाई करत दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतीचं उत्पन्न दाखवून कर चुकवेगिरी केली जात असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळे वित्त विभागाच्या लेखा समितीने यासंदर्भातील प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त आहे. त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
त्यामुळे अतिश्रीमंत शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या आयकर विभागाकडून अतिश्रीमंत शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. यानंतर शेतकऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर दोषी शेतकऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत.
पवारांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्यामुळेच सदावर्तेंना अटक – पत्नीचा गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावले
सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करा; जुही चावल्याच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी फटकारले