Shinde Group : काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले.
मात्र, सरकार स्थापन झाल्यापासूनच शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजीनाट्य अजूनही सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. अजूनही काही नेत्यांमध्ये ही नाराजी कायम असल्याची माहिती समोर आली आहे.
आता शिंदे गटातील एका आमदाराने आपण मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे म्हटले आहे. चिमणराव पाटील असे शिंदे गटातील या आमदाराचे नाव आहे. चिमणराव पाटील यांनी आपण मंत्रिपदाचे दावेदार असल्याचा दावा केला आहे. आपण तशी विनंती केली असल्याचेही ते म्हणाले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला तेव्हा चिमणराव पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु, त्यांना ते न मिळाल्याने ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या समर्थकांमध्येही याबाबत नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे सरकारमधील नाराजीनाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. त्यामुळे शिंदे सरकारपुढे अजूनही मंत्रिमंडळाचा पेच कायम आहे. आता चिमणराव पाटलांनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केल्याने शिंदे सरकारसमोर एक नवीन पेच निर्माण झाला आहे.
यासोबतच सध्या चिमणराव पाटील हे एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आहेत. शिंदे गटातील मंत्री आणि आमदारामध्ये वाद निर्माण झाला आहे. आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यावरून चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे गुलाबराव पाटलांची तक्रारही केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Modi Government : रद्दी विकून मोदी सरकारने कमावले ‘एवढे’ कोटी रुपये; आकडा वाचून धक्का बसेल
Bachchu Kadu : रवी राणा हे फडणवीस आणि शाहांच्या जवळचे, त्यामुळे…; बच्चू कडू यांचे धक्कादायक वक्तव्य
gulabrao patil : शिंदे गटात बंडाची ठिणगी! मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात ‘या’ आमदाराने फुंकले रणशिंग
bjp : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक बंड?, भाजप नेत्याच्या खळबळजनक दाव्याने उडाली खळबळ






