Share

सिद्धार्थ नाही तर एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसणार ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा

२०१४ साली ‘एक व्हिलन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘एक व्हिलन रिटर्न्स’ असे आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम(John Abharahm) मुख्य भूमिकेत आहे.(Not Siddharth but a ‘this’ actor who will appear in a villain returns)

या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण प्रेक्षकांना या चित्रपटासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. निर्मात्यांनी एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाच्या प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. सुरवातीला हा चित्रपट ८ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूरची देखील मुख्य भूमिका आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी आणि तारा सुतारिया दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता जॉन अब्राहामने या चित्रपटासाठी भरघोस मानधन घेतले आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटासाठी अभिनेता जॉन अब्राहामने ‘पठाण’
चित्रपटापेक्षा जास्त फी आकारल्याची माहिती मिळत आहे.

या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि भूषण कुमारच्या टी-सीरिजने संयुक्तपणे केली आहे. मोहित सुरी यांनी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २०१४ साली या चित्रपटाचा पहिला भाग ‘एक व्हिलन’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका केली होती.

या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख सायको किलरच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपुरची देखील महत्वाची भूमिका होती. या चित्रपटाने तिकीटबारीवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती. मिथुन आणि अंकित तिवारी यांनी ‘एक व्हिलन’ या चित्रपटासाठी संगीत दिले होते.

या चित्रपटातील तेरी गलियाँ आणि बंजारा हे गाणे आजही लोकांना ऐकायला आवडते. आता लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी असल्याची माहिती मिळत आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडेल, असे चित्रपटतज्ज्ञांचे मतं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील, असं कधी वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस
शेततळ्याजवळ तीन मुलांच्या चप्पला दिसल्या अन् अख्खं सोलापूर हादरलं; घडलेली घटना वाचून बसेल धक्का
‘तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्यानी सरकारचे आभार मानले पाहिजे’

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now