‘आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले’

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवस पावसाने थैमान घातले होते. यामुळे अनेक घरे उध्वस्त झाले. अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. आता राज्य सरकारने पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली. या पॅकेजवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पॅकेजची किंमत ही पुरेशी नाही, तसेच आम्ही घोषणा करणारे नाही, असं म्हणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच पॅकेजची घोषणा केली आहे, असे म्हणत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. यावेळेस मी पॅकेज घोषित करणारा नाही तर, मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

या विधानावरुन दरेकर यांनी हा टोला लगावला आहे. ते म्हणाले, सरकारच्या पॅकेजची रक्कम पुरेशी नाही. ते मुळात आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले आहे. आम्ही घोषणा करणारे मंत्री नाही. असे बोलत असताना आज पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

आता केवळ मदत मिळाली पाहिजे, अमंलबजावणी झाली पाहिजे, असे दरेकर म्हणाले. राज्याने याआधी तोक्ते चक्रीवादळ तसेच निसर्ग चक्रीवादळचा सामना केला. या संकट काळातही राज्य सरकारने मदत जाहीर केली होती. त्या मदतीपैकी ६०% लोकांना अद्यापही मदतच मिळाली नाही, असे देखील दरेकरांनी नमूद केले.

राज्य सरकारने जी ११ हजार ५०० कोटी रक्कम जाहीर केली आहे. ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, व्यापाऱ्यांना गेली पाहिजे, ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यांना गेली पाहिजे. नाहीतर या पॅकेजची रक्कम ही रस्त्यावर, पुलावर कंत्राटदाराच्या बिलाच्या व्यवस्थेसाठी केली जाईल. अशी भिती दरेकर यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

VIDEO: भरमंडपात ढसाढसा रडायला लागली नवरी; नवरदेवाने सगळ्यांसमोर किस करत केलं गप्प

मुकेश अंबानी खरेदी करू शकतात बर्गर आणि सँडविचची ‘ही’ कंपनी, टाटा कंपनीला देणार टक्‍कर

हॉकीतील भारताच्या विजयाचे वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा भावूक करणारा ‘हा’ व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.