७३ दिवसात नाही! सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले ‘या’ दिवशी येणार कोरोना लस

 

पुणे | जगभरात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक लोकांचे कोरोनामुळे मृत्यूही होत आहे. यामुळे सगळ्यांचे लक्ष कोरोना लसीवर आहे.

भारतात कोरोना लसीच्या बाबतीत सीरम इन्स्टिट्यूट सर्वात पुढे आहे. तसेच सीरम ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेल्या लसीचे परीक्षण आणि उत्पादन करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटला लसीच्या उत्पादनाची मंजुरी सरकारने दिली आहे.

अशात काही वृत्तपत्रांमध्ये सीरम ही लस ७३ दिवसाच्या आता बनवेल असे म्हटले आहे. मात्र आता सीरमने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ७३ दिवसात लस हा केवळ अंदाज आहे, असे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

तसेच जेव्हा परीक्षण यशस्वी होईल आणि रेग्युलेटरी अप्रूव्हल मिळेल, त्यादिवशी COVISHIELD बाजारात येईल. ऑक्‍सफर्ड-अस्ट्राजेनेकाच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू आहे.

एकदा ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास ते स्वतःच तिच्या बाजारात येण्यासंदर्भात माहिती देतील. सीरमची लस देशात केवळ ३ डॉलर, म्हणजेच साधारणपणे २२५ रुपयांना उपलब्ध होईल, अशी माहितीही सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.