मुंबई | भारतात कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर कोरोनाच्या लसीकरणाचे नियोजन सुरु झाले आहे. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. मात्र, ज्यांना लस टोचायची नाही, त्यांच्याकडून लेखी स्वरुपात अभिप्राय घेताला जाणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
लसीकरणचे नियोजन लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर करण्यात आले आहे. यामध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रकारे बुथयंत्रणा कार्य करते त्याचप्रमाणे सर्व लसीकरण मोहिम कार्यान्वित केली जाणार आहे. या बुथवर पोलिस, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांची नियुक्ती केली जाणार आहे.
या लसीकरणाचे पाच टप्पे आहेत. याच्यातील पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ लाख तेरा हजार दोनशे एकोनव्वद आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण १६ जानेवारीला सुरु होणार आहे.
लसीकरणात सहभागी होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. यामध्ये खाजगी व सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. तसेच पाच टप्प्यात राज्यातील सव्वाकोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे.
पाच टप्पे पुढील प्रमाणे करण्यात आले आहेत, पहिल्या टप्प्यात खासगी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात शिक्षक, पोलीस, सरकारी नोकरदार यांचे लसीकरण होणार आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्वाना कोरोना लस टोचली जाईल. चौथ्या टप्प्यात ५० वर्षाच्या खालील रुग्ण गरोदर माता यांना लस दिली जाईल. शेवटच्या पाचव्या टप्प्यात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लस टोचण्यात येणार आहे.
लस टोचलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच जे लोक लस घेणार नाहीत त्यांना त्याचा लेखी स्वरुपात अभिप्राय मागितला आहे. दरम्यान कोरोनाच्या या संकटात लसीची प्रतिक्षा संपली आहे. आता प्रशासन लसीकरणाची मोहिम यशस्वी राबवण्यासाठी सज्ज झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुहूर्त ठरला! देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण
कोरोना लसीच्या दोन डोसांमध्ये अंतर का ठेवतात? ‘हे’ आहे कारण
…अन् सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याला भावना अनावर; ‘आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले’