आम्हाला बोलावले नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही, चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा

पुणे । पुण्यात नुकतीच मेट्रोची चाचणी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र आता या कार्यक्रमावरून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. मी, बापट पुण्यात नसताना हा कार्यक्रम घेण्यात आला. तरीदेखील आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालो होतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच कार्यक्रमाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नव्हता. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात पुण्यातील आमदार असलेले चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट हे उपस्थित नसल्याचे चर्चा सुरू झाली होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१६ ला मेट्रोला परवानगी मिळाली. त्यावेळी अजित पवार नव्हते. मोदी आणि देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे यापुढे कार्यक्रमाला आम्हाला बोलावले नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले, शेवटच्या कार्यक्रमांना मोदींना बोलवावे लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवले जाणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुणेकरांना लवकरच मेट्रोचा लाभ मिळणार आहे. अनेक ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

ऑक्टोबर महिन्यात पुणेकरांना मेट्रो खुली होईल, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

सिंधूला अलिशान कार द्या, मागणीला आनंद महिंद्रा यांनी दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या..

मोठी बातमी! टाटा समूह देणार जिओला टक्कर, 5G साठी केली मोठी घोषणा

हॉकीतील भारताच्या विजयाचे वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा भावूक करणारा ‘हा’ व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.