उत्तर कोरियाचा(North Korea) हुकूमशहा किम जोंग उन(Kim Jong Un) हा त्याने सुनावत असलेल्या कठोर शिक्षांमुळे संपूर्ण जगाला परिचित आहे. त्याने दिलेल्या शिक्षांची संपूर्ण जगात चर्चा होत असते. ह्या शिक्षांमध्ये आता आणखी एका शिक्षेची भर पडली आहे. किम जोंग उन यांनी दिलेल्या शिक्षेमुळे उत्तर कोरियातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.(north korea leader kim jong un punishment)
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांची जयंती होती. त्यांच्या जयंतीनिमित्त स्मारक आणि देशातील रस्त्यांवर किमजोंगिलिया बेगोनिया फुलांची सजावट करण्याचे आदेश किम जोंग उन यांनी दिले होते. किमजोंगिलिया बेगोनिया फुले माळ्यांना न मिळाल्यामुळे किम जोंग उन यांनी त्यांना शिक्षा सुनावली आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी या माळ्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या माळ्यांना आता अंग मेहनीतीची काम करावे लागणार आहेत. १६ फेब्रुवारीला किम जोंग उनच्या वडिलांची जयंती होती. किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांच्या नावावरून या फुलाचे नाव किमजोंगिलिया बेगोनिया ठेवण्यात आले आहे.
१६ फेब्रुवारीला किम जोंग इल यांच्या जयंतीपूर्वी बागेमध्ये किमजोंगिलिया बेगोनिया ही फुले उमलायला हवीत, अशी सूचना किम जोंग उनने माळ्यांना केली होती. मात्र जयंतीपूर्वी बागेमध्ये किमजोंगिलिया बेगोनिया फुले उमलण्यास माळ्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांना किम जोंग उनने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
उत्तर रियांगंग प्रांतातील सॅमसू काउंटीमधील एका माळ्याला फुलांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सहा महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे.हिवाळ्याच्या महिन्यांत हरितगृह पुरेशा प्रमाणात गरम करण्यासाठी माळ्याला सरपण सापडले नाही. परिणामी झाडे मरण पावली. त्याच्यासह इतर अनेक माळ्यांना लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात आले आहे.
आणखी ४० वर्षीय एक माळी चोई यालाही कामगार शिबिरात तीन महिन्यांची शिक्षा झाली आहे. त्यांनी ग्रीनहाऊस बॉयलरचे तापमान नीट सेट केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. किम जोंग-इलची जयंती ही उत्तर कोरियातील सर्वात महत्त्वाची सुट्टी आहे. या प्रसंगी छोट्याशा चुकीसाठीही हुकूमशहा किम जोंग उन कठोर शिक्षा देतो.
महत्वाच्या बातम्या :-
या’ आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, तुमच्या कारचा यामध्ये नंबर आहे का? वाचा संपुर्ण यादी
सुरेश रैनाला चेन्नई सुपरकिंग्जने संघात का नाही घेतले? माजी खेळाडूने धोनीचे नाव घेत सांगितले धक्कादायक कारण
बाळासाहेबांचा सच्चा शिलेदार हरपला, ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन