नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीन कोटी व्ह्युजचा टप्पा

मागील काही दिवसांपासून ‘भुज’ चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासूनच ‘भुज’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगाला पोहचली आहे.

देशभक्तीने परिपूर्ण असलेल्या ‘भुज’ चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रचंड गाजत आहे. इतक्यातच या चित्रपटातील ‘जालिमा कोका कोला’ हे पहिल गाणं प्रदर्शित झाले आहे. अभिनेत्री नोरा फतेहीच हे गाणं प्रचंड हिट झाल आहे. नोराच्या या गाण्याने अक्षरशः आग लावली आहे.

या गाण्याची विशेष गोष्ट म्हणजे हे गाणं नोराच्या इतर गाण्यांपेक्षा खूपच वेगळ आहे. या गाण्यात नोराचा देसी अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या या लुकची सगळीकडे चर्चा होत आहे.

‘जालिमा कोका कोला’ हे गाणं काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. अगदी थोड्याच दिवसात या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आपण पाहिलत तर गाण्याला युट्युबवर फक्त तीनच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

या गाण्यामध्ये आपल्याला नोराचा हटके अंदाज पाहायला मिळेल. तसेच या गाण्यामुळे नोराच्या फॅन फॉलोविंगमध्ये नक्कीच भर घालणार यात काही शंकाच नाही. गाण्यामध्ये नोराने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला असून, पायात पैंजण, मांगटिका, कानातले घातले आहे. या लुकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

नोराच्या या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर ती एक उत्तम डान्सर आहे त्यामुळे तिने जबरदस्त डान्स केला आहे. सगळ्यांना ठाऊकच आहे नोराच्या गाण्यात नेहमीच काहीतरी हटके आणि वेगळी स्टेप असते. या गाण्यातही वेगळ्या स्टेप्स पाहायला मिळत आहे. या गाण्यात तिने मधेमधे बेली डान्स देखील केला आहे.

श्रेया घोषालने गायलेलं हे गाणं तनिष्क बागची यांनी लिहिलं आहे. तसेच या गाण्याला वायू यांनी संगीत दिल आहे. हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केल आहे. या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली आहे.

हे ही वाचा-

श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट इमोजीवाली ही व्यक्ती कोण?

पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून वेड्या झाल्या होत्या दोन सिनियर अभिनेत्री; मनोज समोर दिसताच पडल्या होत्या पाया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.