Noori Parveen : खाजगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ शुल्कामुळे वैद्यकीय सेवा गरिबांच्या आवाक्याबाहेर असताना, आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील एक तरुण डॉक्टर शुल्क म्हणून अवघ्या 10 रुपयांमध्ये उपचार देत आहे. 28 वर्षीय तरुणी डॉक्टर नूरी परवीन रुग्णालयात दाखल रुग्णांकडून एका बेडसाठी फक्त 50 रुपये घेते.
डॉ. परवीनने कृष्णा जिल्ह्यातील चल्लापल्ली येथून चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी विजयवाडा येथे आली. तिने फातिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (FIMS), कडप्पा येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले.
कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ. परवीन आपल्या वर्गमित्रांसह अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात जाऊन समाजसेवा करत असत. डॉक्टर झाल्यानंतरही तिने ही प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. डॉ. परवीन हिने नुकतीच महिला आरोग्य सुविधाही सुरू केली आहे. यामध्ये केवळ दहा रुपयांत स्त्रीरोग सल्ला दिला जातो.
डॉ. परवीनचे वडील मोहम्मद मकबूल हे एक व्यापारी असून ते धर्मादाय कार्यात सहभागी होत असतात. डॉ. परवीन यांचे आजोबा नूर मोहम्मद हे ऐंशीच्या दशकात कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. डॉक्टर परवीनला नाममात्र पैसे घेऊन उपचारासाठी लोकांकडून खूप आशीर्वाद मिळतात, पण तरीही तिला तिच्या खर्चासाठी वडिलांकडून पॉकेटमनी घ्यावा लागतो.
पैसे कमवण्याऐवजी समाजातील वंचित लोकांची सेवा करणे हेच आपले ध्येय असल्याचे डॉ. परवीन सांगतात. डॉ. परवीनने कडप्पाच्या एका गरीब भागात तिचे क्लिनिक उघडले. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिच्या पालकांना या निर्णयाची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
डॉ.परवीनच्या क्लिनिकमध्ये लॅब, छोटी फार्मसी यासह सर्व सुविधा आहेत. रुग्णालात तातडीने दाखल करणे आवश्यक असल्यास त्यांच्या क्लिनिकमध्ये काही बेड देखील आहेत. ती गंभीर रुग्णांना इतर वैद्यकीय केंद्रे किंवा तज्ञ डॉक्टरांकडे पाठवते.
महत्वाच्या बातम्या
फक्त २० हजारात सुरू करा ‘हा’ धंदा अन् कमवा महिन्याला ४ लाख; PM मोदींनी सांगीतली भन्नाट आयडीया
अंगठ्याला दुखापत, हाताला टाके असूनही फलंदाजीला रोहित उतरला; कॅप्टनच्या जिद्दीने जिंकली सर्वांची मने
गुजरातमध्ये भाजपने रेकॉर्ड तोडला, ऐतिहासिक विजयाचे संकेत; काँग्रेसचा सुपडा साफ