जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. या हत्येनंतर जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir) खोऱ्यातील लोकांचा संताप उसळला आहे. हत्या करण्यात आलेल्या काश्मिरी पंडिताचे नाव राहुल भट असे आहे. राहुल भट यांच्यावर आज जम्मूमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. राहुल भट यांना पाच वर्षांची मुलगी आहे.(No words came out of mothfamily is emotional with Rahul’s memor)
राहुल भट यांची पत्नी मीनाक्षी त्यांच्या आठवणीने भावुक झाल्या होत्या. राहुल भट यांची पत्नी मीनाक्षी म्हणाल्या की, ” जेव्हा तो वाटेने जायचा तेव्हा सर्वजण त्यांना नमस्कार करायचे. लोक म्हणायचे तुझ्याशिवाय बडगाम अपूर्ण वाटतं. मी त्याच्याशी १० मिनिटांपूर्वीच बोलले होते. मला माहित नव्हते की कोणी त्याला गोळी मारेल.”
“जेव्हा मला फोन आला. त्यावेळी मला काहीतरी घडल्याची शंका आली. मला भीती वाटू लागली होती. राहुलच्या खांद्याला गोळी लागली आहे, असे मला सांगितले गेले. माझ्या शरीरातून त्राण निघून गेला होता”, असे राहुल भटची पत्नी मीनाक्षी म्हणाली. यावेळी मीनाक्षीने सांगितले की, “तिच्या मुलीला माहित नाही की तिचे वडील या जगात नाहीत.”
३५ वर्षीय राहुल भट महसूल विभागात लिपिक पदावर कार्यरत होते. पतीबाबत पत्नी मीनाक्षीने सांगितले की, “मी त्यांना नोकरी सोडण्यास सांगितले पण त्यांनी माझे ऐकले नाही.” पत्नी मीनाक्षीने पुढे सांगितले की, “माझ्या पतीला यापूर्वी कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. मला काहीही नको आहे, फक्त माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना मारून टाका”, असे मीनाक्षीने सांगितले आहे.
राहुल भटचे वडील बिट्टाजी भट म्हणाले की, “मी आता काय सांगू. सर्व काही संपले आहे. म्हातारपणात मूल हा आई-वडिलांचा आधार असते. पण तो आता निघून गेला आहे”, असे राहुल भटचे वडील बिट्टाजी भट यांनी सांगितले. मुलाबद्दल बोलताना बिट्टाजी भट यांना रडू आवरले नाही. राहुलला कोणतीही धमकी किंवा पत्र आल्याचे वडिलांनी पूर्णपणे नाकारले.
राहुल ८ दिवसांपूर्वी आपल्या आजारी मावशीला भेटण्यासाठी जम्मूला आला होता. राहुलच्या वडिलांनी सांगितले की, “दहशतवादी राहुलच्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी ऑफिसमधील लोकांना विचारले की राहुल कोण आहे? त्यावेळी राहुल त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने मीच राहुल आहे असे सांगितले. त्यावर दहशतवाद्यांनी पिस्तूल काढून त्याच्यावर गोळ्या झाडल्या”, असे राहुलचे वडील बिट्टाजी भट यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
लिलावात विकला गेला जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा, किंमत वाचून डोळे होतील पांढरे
मुंबईच्या ‘या’ खेळाडूच्या हुशारीसमोर धोनीही झाला फेल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
‘भारतीय अभिनेत्यांना माहीतच नाही अभिनय काय असतो’, बॉलिवूड स्टार्सवर संतापला प्रॉड्युसर