नो टेंशन! ‘असे’ मिळवता येणार whatsapp मधून डिलीट झालेले फोटो व व्हिडिओ

दिल्ली | अनेक whatsapp वापरकर्त्यांना एक सवय असते काही कारणामुळे ते whatsapp वरचे महत्वाचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतात. पण नंतर त्यांनाच या गोष्टीचा पश्चाताप होतो. चिंता करू नका आम्ही तुम्हाला सांगतो हेच फोटो आणि व्हिडिओ कसे परत मिळवायचे.

whatsapp मधील हा डेटा तुम्ही ३० दिवसांच्या आत परत मिळवू शकता म्हणजे डाऊनलोड करू शकता. पण हा डेटा फक्त ३० दिवसच सर्व्हरवर उपलब्ध असतो नंतर तो आपोआप डिलीट होतो. जर युजरने चॅट हिस्टरी डिलीट केली नसेल तर हा डेटा परत मिळू शकतो.

यासाठी तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडिओ हवा आहे तोपर्यंत स्क्रोल करा आणि फोटो, व्हिडिओवर क्लिक करून डाऊनलोड करा. फक्त लक्षात ठेवा तुम्ही जे डाऊनलोड करताय ते ३० दिवसांच्या आतील असावे.

अनेकदा फोटो डाऊनलोड करताना एक एरर मेसेज येतो ज्यात असे लिहिलेले असते की, Can’t download, Please ask that it be resend to you ? जेव्हा असा मेसेज येईल तेव्हा फोनवर इंटरनेट चालू आहे की नाही हे पाहावे लागेल.

इंटरनेट चालू नसेल तरिही एरर येत असेल तर एकदा तुमचे स्टोरेज चेक करून घ्या कारण स्टोरेज भरलेले असलेले तरीही प्रॉब्लेम येऊ शकतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.