अशी तगडी ऑफर परत नाय; महिन्याला ३,५५५ रुपये भरा आणि घरी घेऊन या टाटाची कार

मुंबई |स्वत:च्या मालकीची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतू आजकालच्या महागाईच्या जमान्यात नवी कार खरेदी करणं अनेकांच्या खिशाला परवडत नाय. मात्र आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही.

टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. तुम्ही कमीत कमी पैशाचा महिन्याचा हप्ता घेऊन टाटाची नवी कोरी कार दारात उभी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या ऑफरची संपुर्ण माहिती.

टाटा मोटर्स ही भारतातील कार, ट्रकची निर्मिती करणारी मोठी कंपनी आहे. टाटा कंपनी नेहमी ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा कारची निर्मिती करत असते. टाटाने नॅनो ही कमी किंमतीतील कार बाजार आणून सर्व सामान्यांची कार घेण्याची इच्छा पुर्ण केली होती.

आता पुन्हा टाटाने हॅचबॅक कार टियागोवर बंपर ऑफरची घोषणा केली आहे. cars.tatamotors.com  या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही फायनान्स करून अवघ्या ३,५५५ रुपयांचा महिन्याचा हप्ता घेऊन कार घरी घेऊन जाऊ शकता. या ऑफर बाबत अधिक माहिती हवी असेल तर  जवळच्या टाटा डीलरकडे जाऊन माहिती घेऊ शकता.

दिल्लीच्या शोरूममधील या कारची किंमत ४.८५ लाख ते ६.८४ लाखांच्या दरम्यान आहे. कार एरिजोनो ब्लू, डेटोना ग्रे, सिल्वर, फ्लेम रेड, पर्लसेंट व्हाईट या आकर्षक रंगामध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टाटाने सुरक्षेच्यादृष्टीने अँटी लॉक, ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्राॅनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, डबल फ्रंट एअर बॅग, रिअर पार्किंग सेन्सर, स्पीट अर्लट सिस्टीम देण्यात आली आहे.

टियागोच्या इंजिनविषयी सांगायचं झालं तर यामध्ये बीएस ६ कम्पिलियंट १.२ लीटर, ३ सिलेंडर क्षमता असलेलं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे ६००० आरपीवर ८६PS पॉवर आणि ३३०० आरपीवर ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्सह येते.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनात राज्याच्या मदतीसाठी पुणेकर उद्योगपती आला धावून, परदेशातून आणणार ३५०० व्हेंटिलेटर्स
कांचनावाडीची टुटी-फ्रुटी थेट दुबईत; २३ वर्षीय ऋषीकेशची पुर्ण देशात चर्चा
ऐन कोरोनाच्या संकटात मुकेश अंबानीची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग; ५९२ कोटींचा रिसॉर्ट केला खरेदी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.