Sanjay Raut : पहलगाममध्ये घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त करत १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर १२ मे रोजी पंतप्रधान *नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित* करत या कारवाईविषयी पहिल्यांदाच अधिकृतपणे माहिती दिली आणि पाकिस्तानला इशारा दिला की, “*भारताच्या विरोधात कोणतीही दहशतवादी कारवाई सहन केली जाणार नाही, त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल.*”
मात्र, या भाषणावर *शिवसेना (ठाकरे गट)* चे नेते आणि खासदार *संजय राऊत* यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचं भाषण फोल, दिशाहीन आणि राष्ट्रप्रमुखाला न शोभणारे असल्याची टीका करत राऊत यांनी थेट आरोप केला की, “हे लोक फक्त पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान नाही.”
संजय राऊत यांचा थेट आरोप: “हे एक नंबरचं बकवास भाषण होतं”*
संजय राऊत म्हणाले, “*मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास होतं. ते विजयी राष्ट्रप्रमुखाचं भाषण नव्हतं. आमचं सैन्य, वायुदल, नौदल सर्व पाकिस्तानचा विनाश करण्यासाठी सज्ज होतं. मात्र, मोदींनीच त्यांना थांबवलं. जर ते थांबले नसते, तर पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे झाले असते.*”
“मोदी-शाह फक्त पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान नाही”*
राऊतांनी पुढे टीका करत म्हटलं, “*काल लक्षात आलं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची खरी लायकी फक्त ईडी-सीबीआयच्या जोरावर पक्ष फोडण्यातच आहे. पक्ष तोडणं, विकत घेणं, हीच यांची क्षमताच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत त्यांच्यात नाही. ती असती, तर पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ठरले असते आणि पाकिस्तान फुटला असता.*”
“तिरंगा यात्रा काढणाऱ्यांना तिरंग्याला हात लावण्याची लायकी नाही”*
राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या देशप्रेमावरही शंका व्यक्त करत जोरदार टीका केली. “*हे लोक तिरंगा यात्रा काढतात, पण तिरंग्याला हात लावण्याची त्यांची लायकी नाही. वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी मोदींना होती, मात्र त्यांनी ती व्यापारासाठी गमावली. अदानी-अंबानी यांच्यासाठी त्यांनी सौदेबाजी केली. त्यांच्यासाठी देश नव्हे, व्यापार मोठा आहे.*”
“भविष्यात सर्व सौदे उघड होणार”*
संजय राऊत यांनी असा इशाराही दिला की, “*भविष्यात हे सर्व सौदे, त्यामागचं राजकारण, आणि कोणाच्या दबावाखाली निर्णय झाले, हे सगळं उघड होणार आहे. देशाला सत्य कळेल आणि त्या दिवशी जनतेचा विश्वास कोणावर होता, याचे उत्तरही स्पष्ट होईल.*”
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं*
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर देशात राष्ट्रभक्तीची लाट उठली असताना, संजय राऊत यांची ही घणाघाती टीका केंद्र सरकारसाठी अडचणीची ठरू शकते. सत्ताधारी भाजपकडूनही संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
राजकीय टीका की राष्ट्रीय सुरक्षा विषयावर प्रश्नचिन्ह?*
राजकीय विश्लेषकांच्या मते, “*संजय राऊत यांची टीका ही केवळ राजकीय रणनीतीचा भाग असू शकते. मात्र, ती सध्याच्या संवेदनशील काळात देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर अविश्वास निर्माण करणारी आहे.” दुसरीकडे, विरोधकांचा दावा आहे की, “*पाकिस्तानवर निर्णायक आघात करण्याची संधी केंद्र सरकारने गमावली.”
no-one-dares-to-break-pakistan-sanjay-rauts-attack