१५ वर्ष जुन्या गाड्या आता थेट जाणार भंगारात, जाणून घ्या नवीन नियम

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता सरकारी विभागाची आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडील १५ वर्षाहून जुनी सरकारी वाहनं आता थेट भंगारात निघणार आहेत.

१ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभाग १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करू शकणार नाहीत. हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिला आहे. जर या प्रस्तावास मंजुरी मिळाली तर ही व्यवस्था अंमलात येईल.

याचबरोबर यासंदर्भात मंत्रालयाने नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत म्हंटले आहे की, ‘एकदा हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर हा नियम सर्व सरकारी वाहनांना लागू होईल. हा नियम केंद्र व राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका संस्था आणि स्वायत्त संस्था यांना लागू होईल.

दरम्यान, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३६ जुलै २०१९ रोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या १५ वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

काय बोलावे! अभिनेते राजकूमार यांनी त्यांच्या कुत्र्याला विचारुन हिट चित्रपटाला नाकारले होते

जर रोहित शर्मा खेळला नाही, तर माझा टीव्ही कायमचा बंद राहील; सेहवाग कोहलीवर भडकला

चक्क शिवसेना आणि एमआयएम यांची युती, उंदीर-मांजराच्या मैत्रीची राजकीय वर्तुळात चर्चा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.