‘इंजेक्शन नको मला दारू पाहिजे’; सोशल मिडीयावर महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. उपाचाराअभावी रूग्णांना प्राण गमावावे लागत आहेत. देशात ऑक्सिजन, बेड, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावत आहेत.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही. संचारबंदीच्या काळातही लोक बाहेर फिरतानाचं चित्र दिसून येत आहे.

राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाने भयान रुप धारण केले आहे. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री १० वाजेपासून सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची घोषणा करताचं दिल्लीत वेगळचं चित्र पाहायला मिळालं.

दिल्लीत सोमवारपर्यंत दुकाने बंद असल्याने दारूप्रेमींनी दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी प्रत्येकजण लॉकडाऊन काळात दारूचा आस्वाद घेता यावा यासाठी सहा दिवस पुरेल इतका स्टॉक घेऊन जात होते. प्रत्येकाची दारू घेण्यासाठी धडपड सूरू होती.

या गर्दीमध्ये एक महिला दारू घेण्यासाठी आली होती आणि  तिने दारूबद्दल जे मत व्यक्त केलं त्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. मला इंजेक्शनने फायदा होणार नाही तर दारूने फायदा होईल असं या महिलेने म्हटलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मिडियावर सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता महिला म्हणते की, मी एक बॉटल आणि दोन क्वाॅर्टर घ्यायला आले आहे. इंजेक्शनने फायदा होणार नाही अल्कोहोलने फायदा होईल. इथं आलेली सगळी  लोक दारू पितात आणि ती व्यस्थित राहतील. आमच्यावर औषधाने काहीच फरक पडणार नाही. दारूने फरक पडेल.

पुढे म्हणते की. मी ३५ वर्षांपासून दारू पिते. इतक्या वर्षात मी दुसरा कोणताही डोस घेतला नाही. रोज एक पेग घेते तोच आमचा डोस आहे. दिल्लीत एक आठवड्याचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. पण दारूची दुकानं सुरू राहायला पाहिजेत. आम्हाला हॉस्पीटलमध्ये, डॉक्टरांकडे जाण्याची गरज वाटणार नाही. आतापर्यंत वाटणार नाही आणि इथूनही वाटणार  नाही. असं या महिलेने म्हटलं आहे.

दरम्यान देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दि. १९ रोजी दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
द कपिल शर्मा शो मधील सुगंधा ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत करणार लग्न
‘जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणूस बोलतोय’ राहूल गांधींच्या निर्णयाचे अभिनेत्याने केले कौतूक
आनंदाची बातमी! कोरोनावर ९९ टक्के प्रभावी पडणारा नेझल स्प्रे लस आता भारतातही मिळणार

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.