पाटलांना राष्ट्रवादीमध्ये आता एन्ट्री नाही, दिल्या घरी सुखी रहा; शरद पवारांचा टोला

अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहाणी करण्यासाठी शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी उस्मानाबादच्या पाटील परिवाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. त्यासंदर्भात बोलताना दिल्या घरी सुखी राहा, अशा शब्दात पवारांनी पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याच स्पष्ट केले.

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर शरद पवार यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, “मागील २० वर्षांत विरोधक म्हणून एकनाथ खडसे सर्वात प्रभावी होते. सभागृहात आक्रमक आणि सक्रीय म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. मात्र त्यांची योग्य नोंद भाजपाने घेतली नाही. पुढील राजकीय निर्णय काय घ्यावा? हा त्यांचा प्रश्न आहे.”

त्याचसंदर्भात बोलाताना शरद पवार म्हणाले “आपल्याला सोडून गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. मात्र उस्मानाबादमधील सोडून गेलेल्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही. दिल्या घरी सुखी राहा! अश्या शब्दांत पवारांनी पाटील कुटुंबाला टोला लगावला आहे.

राज्यातील अनेक नेते जे राष्ट्रवादी सोडून गेले, ते परत राष्ट्रवादीत येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही भागातील नेत्यांबाबत पक्षाने निर्णय घेतला आहेत. त्यात उस्मानाबादच्या नेत्यांचे नाव न घेता त्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवारांनी जाहीर केले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि नातेवाईक असणारे पाटील कुटुंबाने राष्ट्रवादीला रामराम केला. आणि भारतीय जनता पार्टीत अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद पवारांच्या या विधानामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..

रस्ता वाहून गेला तरीही फडणवीस बांधावरुन चिखल तुडवत शेतकऱ्याच्या भेटीला..

मुख्यमंत्री गावातच आले नाही तर नुकसान दिसणार कसे; पुलावर बोलावल्याने ग्रामस्थ संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.