घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव मोदी सरकारनं फेटाळला

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. अशातच मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळून लावला आहे.

मात्र एकीकडे हे उत्तर दिलेलं असतानाच दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाण्यासंदर्भात माहिती दिली होती. लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून ही मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील भाष्य आरोग्यमंत्र्यांनी केले होते.

याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईमध्ये जवळपास दीड लाख लोकं असे आहेत जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा दिव्यांग आहेत. या लोकांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाणं शक्य नाही.

त्यामुळे अशांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असं कोणतही धोरण नाही असं सांगितलं आहे. परवानगी मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता,” असे सचिव सुरेश काकाणी यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रलायतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या करोनाची दुसरी लाट आली आहे. केंद्र सरकारने तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष योजना तयार केली असून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.

“अनेकांना लसीकरणासंदर्भात भीती वाटत असली तरी ते रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेत आहेत. आपल्याला संसर्ग होईल अशी भीती त्यांच्या मनात आहेत. आम्ही आता लसीकरण तळागाळातील लोकांपर्यंत नेणार आहोत. त्यामुळे लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागणार नाही,” असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या 

वाझे प्रकरणात संजय राऊतांच्या चौकशीची कॉंग्रेस नेत्याची मागणी; राजकारणात खळबळ

फिल्मी व खऱ्या पोलीसांत जमीनअस्मानाचा फरक; त्यामुळे पोलीसांना ‘असं’ काम करावं लागतं – उद्धव ठाकरे

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.