नितीशकुमार मुख्यमंत्रीपद सोडणार ? केले मोठे विधान

बिहार । नुकताच बिहार निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळाली. तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक मोठी चुरशीची केली होती.

यानंतर आता मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या कमी जागा येऊनही मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेत असताना त्यांच्यावर टीका होत आहेत. यावर नितीश कुमार यांनी मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मोह नसल्याचे सांगितले आहे.

नितीश कुमार म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल यासंदर्भातील निर्णय रालोआच्या बैठकीत घेतला जाईल. याचवेळी लोक जनशक्ती पक्षाला सहभागी करून घ्यायचे की नाही याबाबतही निर्णय घेण्यात येईल.

या निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता तरी ते अंतरात्म्याचा आवाज ऐकत खुर्चीचा मोह सोडतील का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला होता.

या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. काँग्रेसला जास्त जागा दिल्याने तेजस्वी यांचे मोठे नुकसान झाले असे देखील सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.