…अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण सहभागी होईन; कॉंग्रेसचा बडा मंत्री आक्रमक

मुंबई : दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हंटले आहे.

ते याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईल.’

‘सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आकडेवारी गोळा करण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे नियुक्त करण्याचे ठरले होते. मात्र या नियुक्तीचा जीआर अद्यापही निघालेला नाही,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, मंत्रालयातील झारीतील शुक्राचार्य कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करीत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर अनुसूचित जाती प्रदेश काँग्रेसने आक्रमक आंदोलन केल्यास वा उपसमिती अध्यक्षाच्या घरासमोर निदर्शने करायचे ठरविल्यास आपण आंदोलनात सामील होऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; पक्ष सोडताना केले गंभीर आरोप

शिधावाटप दुकानांवरील वॉच आता होणार अधिक कडक; दुकानदाराची करता येणार तक्रार

मोदी सरकारच्या या योजनेमुळे एप्रिलपासून तुमचा पगार कमी होण्याची शक्यता

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.