राहूल गांधी समुद्रात पोहले, त्यांनी पुशअप्स मारले, त्यांचा शर्ट घामाने भिजला की भक्तांना घाम का फुटतो?

काँग्रेस नेते राहूल गांधी त्यांच्या दौऱ्यावरुन नेहमीच चर्चेत असतात. ते दौऱ्यावर असे काही करत असतात की दुसरा एखादा नेता असे काही करण्याचा विचारही करु शकत नाही. कधी ते समुद्रात पोहताना दिसून येतात तर कधी ते पुशअप्स मारताना दिसून येतात.

आता सध्या राहूल गांधी जम्मु काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी वैष्णव देवींचे दर्शन घेण्यासाठी राहूल गांधी यांनी १४ किलोमीटर पायी प्रवास केला आहे. १४ किलोमीटर चालल्यामुळे ते घामाने पुर्णपणे भिजले होते. त्यांच्याही फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

राहूल गांधीच्या या घामाने भिजलेल्या फोटोमुळे ते सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहे. अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे, तर अनेकजण त्यांना ट्रोल करत आहे. आता राहूल गांधीना ट्रोल करणाऱ्या लोकांवर काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी निशाणा साधला आहे.

राहूलजी समुद्रात पोहले, त्यांनी पुशअप्स मारले, त्यांचा टी-शर्ट घामाने भिजलेला दिसला की भक्तांना का घाम फुटतो, असे ट्विट नितीन राऊत यांनी केले आहे. सध्या नितीन राऊत यांचे हे ट्विट जोरदार व्हायरल झाले आहे. अनेक लोकांनी या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

दरम्यान, राहूल गांधीचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे. यावेळी त्यांच्याशी काही पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी राहूल गांधी म्हणाले, मी यावेळी राजकारणावर काहीच भाष्य करणार नाही. मी येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे.

राहूल गांधी यांनी १४ किलोमीटरची पायी यात्रा केली आहे, त्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी राहूल गांधी यांनी आरतीत भागही घेतला आहे. तसेच तिथल्या पुजाऱ्यांसोबत मंत्रोच्चारणही केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

तारक मेहता शोच शुटींग थांबलं! दोन कलाकारांची तब्येत बिघडल्याने निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय….
एवढे पैसे असून काय उपयोग, वृद्धांला मदत न केल्याने लोक श्रद्धा कपूरवर भडकले; पहा व्हिडिओ…
भारतीय वंशाच्या जसकरणाने ठोकले सहा बॉलात सहा सिक्स अन् रचला इतिहास; व्हिडिओ होतोय व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.