अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसला दणका! औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश…

अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसला दणका! औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश…
औरंगाबादमध्ये कॉंग्रेसला खिंडार! औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने औरंगाबादमध्ये कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते.

अखेर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी हाती शिवबंधन बांधलं. काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता सेनेच्या ताब्यात आल्यामुळे जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्थेमुळे शिवसेनेचे बळ आणखी वाढले आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी २१ मार्च रोजी मतदान पार पडलं. त्यावेळी मतदान केंद्राबाहेर एक पोलीस कर्मचारी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात वाद झाला होता. पोलीस कर्मचाऱ्याने सत्तार यांना बाजूला थांबायला सांगितलं. त्यावरुन सत्तार यांनी मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातल्याचं सांगितलं जात आहे.

क्रांती चौकातील मतदान केंद्रावर हा गोंधळ सुरु होता. तर विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी केला. त्यावर भडकलेल्या पोलिसांनी सत्तार यांनाही उत्तर दिलं. आणि त्यानंतर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली गुडन्युज; बेबी बंपर फोटो व्हायरल

मुंबईत लोकल प्रवासावर निर्बंध? धार्मिक स्थळे, माॅल बंद होणार; महापौरांनी दिले संकेत…

बाॅलीवूड पुन्हा हादरले! भाजपची खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ब्लड कॅन्सर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.