एका शिवसैनिकानेच केली नितीन नांदगावकरांना शिवीगाळ व दिली जीवे मारण्याची धमकी

 

मुंबई | शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी हिरानंदानी हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना रुग्णाचे बिल कमी होण्याबाबत, रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला होतो.

यानंतर नितीन नांदगावकरांना शिवसेनेच्याच एका नेत्याचा फोन आला. फोनवर त्या नेत्याने नितीन नांदगावकरांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

शिवसेना प्रभारी संघटक तुलसी सिंग राजपूत यांनी ही शिवीगाळ केली आहे. तसेच नितीन नांदगावकरांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याची माहिती आहे. सध्या या फोनची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

तुलसी सिंग राजपूत यांनी नितीन नांदगावकारांना उत्तर भारतीयांना जाब विचारण्याची हिम्मत कशी केली? तसेच उत्तर भारतीयांना शिवीगाळ का केली? असा प्रश्न विचारत शिवीगाळ केली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी यावेळी त्यांनी दिली आहे.

आता जीवे मारण्याची धमकी आल्याने नितीन नांदगावकरांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तसेच आरोपीविरोधात शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृतदेह ताब्यात द्यावा तसेच हिरानंदानी रूग्णालय प्रशासनाने कुटुंबाला दिलेले बिल कमी करावे. यासाठी नितीन नांदगावकर यांनी रूग्णालय प्रशासनाशी वाद घातला होता.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.