एका रेल्वे पोलीस(Railway Police) कर्मचाऱ्याने प्रॉपर्टी एजंटकडे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्याकडे धाव घेतली होती. या प्रॉपर्टी एजंटने रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याची साडे सहा लाखांची फसवणूक केली आहे. राज दुबे असं या प्रॉपर्टी एजंटचे नाव आहे. तर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आनंद भीमराव चव्हाण असं आहे.(nitin nadgaonkar help railway police constable viral video )
शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नितीन नांदगावकर यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद चव्हाण यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांचे आभार देखील मानले.
महत्वाची बाब म्हणजे आनंद चव्हाण हे स्वतः रेल्वे पोलीस दलात कार्यरत असताना देखील पोलिसांकडून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. आनंद चव्हाण यांनी प्रॉपर्टी एजंट दुबेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी प्रॉपर्टी एजंटविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद चव्हाण यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची भेट घेतली.
यासंदर्भात माहिती देताना रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद चव्हाण यांनी सांगितले की, ” पोलीस कर्मचारी असून देखील मी काही करू शकत नव्हतो. प्रॉपर्टी एजंटने मला शिव्या देखील दिल्या. पण मी कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगू की त्याने मला शिव्या दिल्या. एवढी माझी हतबलता झाली होती. मला न्याय मिळेल याची शाश्वती मला वाटत नव्हती. पण मला इथे न्याय मिळाला आहे”, असे आनंद चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी सांगितले की, “त्या प्रॉपर्टी एजंटने आनंद चव्हाण यांना थोडेफार पैसे दिले. पण नंतर बाकीचे पैसे दिलेच नाहीत. आता फोन केल्यानंतर तो शिवीगाळ करत आहे”, असे नांदगावकर म्हणाले. त्यानंतर नांदगावकर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला प्रॉपर्टी एजंट दुबेला फोन लावण्यास सांगितले आणि फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी प्रॉपर्टी एजंट दुबेशी संवाद साधला. नितीन नांदगावकर प्रॉपर्टी एजंट दुबे यांना म्हणाले की, “तुम्ही आनंद चव्हाण यांना शिवीगाळ केली. हे प्रकरण आता तुम्ही मिटवायला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे महिनाभर वेळ मागितला. मी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वेळ दिला होता. पोलिसाला शिव्या द्यायची तुमची एवढी हिंमतच कशी होते?”, असा सवाल नितीन नांदगावकर यांनी प्रॉपर्टी एजंटला केला.
https://www.facebook.com/watch/?v=641659633564360
यानंतर काही दिवसांनी रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद चव्हाण यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची परत भेट घेतली. त्यावेळी आनंद चव्हाण यांनी नितीन नांदगावकर यांना सांगितले की, “तुमच्या एका फोनवरती मला माझे पैसे परत मिळाले. ज्या पैशांची मी आशा देखील सोडून दिली होती. ते पैसे तुमच्या एका फोनवरती मला परत मिळाले. तुम्ही माझ्यासाठी देवदूत म्हणून धावून आलात. मी तुमचा आभारी आहे”, असे आनंद चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
बांगलादेशला धूळ चारत भारताचा मोठा विजय; वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता सुकर
‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता
‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ५०% रक्कम पंडीतांना दान करावी नाहीतर…’, करणी सेनेचा इशारा