Share

Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत गेले तर ‘या’ नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी, गडकरींचे मोठे वक्तव्य

Nitin Gadkari Devendra Fadanvis

Nitin Gadkari : नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद तर आशिष शेलार यांना मुंबईचे भाजप अध्यक्षपद देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे आज नागपूर येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व भाजपचे इतर नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल एक मोठे विधान केले आहे. “जो व्यक्ती महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष बनतो तो पुढे काय काय बनतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे. पण फडणवीस हे जर उद्या दिल्लीत गेले तर तुमचा सुद्धा राज्यामध्ये विचार होऊ शकतो,” असे विधान त्यांनी केले आहे.

“कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. एक झोकून देऊन काम करणारे तर दुसरे बोटाने मलम लावणारे. चंद्रशेखर बावनकुळे हा झोकून देऊन रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला आहे. ऊर्जा खात्यात असताना त्यांनी शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन मिळवून दिले” असेही गडकरी यावेळी म्हणाले.

तसेच, बावनकुळे पक्ष वाढविण्यासाठी महाराष्ट्रात फिरले. बावनकुळे यांची सुरुवात रिक्षाचालक म्हणून झाली. पुढे ते आमदार झाले, मंत्री झाले. एक ऑटो रिक्षा चालवणारा माणूस आपल्या कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला हे आपल्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे, असेही नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

प्रदेशाध्यक्षपद हे मोठे पद आहे. हे पद मिळाल्यानंतर काय होते हे माहित आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होतील पण, कदाचित फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळेंना संधी असल्याचे वक्तव्य यावेळी नितीन गडकरी यांनी केले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, “आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदारांच्या पोटातून खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री कधीच होत नाही. आज देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे.

त्यांनी त्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या हाताखाली काम केले. ते आजारी असताना त्यांनी कधीही राजकारणात संधी द्या, असे सांगितले नाही. तसेच फडणवीस हे राजकारणात आले आणि ते स्वकर्तृत्वावर नगरसेवक, महापौर आणि मुख्यमंत्री झाले आहेत, असे सांगत नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या
‘ ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, ते भाजपमध्ये आले तरी चौकशी थांबणार नाही’; भाजप नेत्याने स्पष्टच सांगितलं
Uddhav Thackeray : लढा अजून संपलेला नाही! उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, आमदारकीचा राजीनामा घेतला मागे
Nawab Malik : नवाब मलिकांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्वाची अपडेट, रुग्णालयातील मुक्काम वाढला
Rakesh Jhunjhunwala Died : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे अचानक निधन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now