nitin gadkari weight loss secret | वाढलेले वजन ही अनेकांसाठी समस्या बनलेली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करतात. कोणी जिम लावतं तर कोणी डायट करतं. अनेकजण तर खाणेपिणे सुद्धा बंद करतात. पण कोणाचे कोणत्या मार्गाने वजन कमी होईल हे सांगता येत नाही.
अशात आधी वजन कसे वाढते हे आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही जेवढ्या कॅलरीज पचवू शकतात. त्याहून अधिक कॅलरीज तुम्ही खाण्यात घेतल्या तर तुमचे वजन वाढते. म्हणजेच तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमचा कॅलरीजचा काऊंट कमी करावा लागतो.
जेवढ्या कॅलरीज तुम्ही पचवू शकतात, तेवढ्या कॅलरीजमध्ये तुम्ही काहीही खाऊ शकतात. तुम्ही कितीही खाऊ शकतात. पण तुम्हाला फक्त तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करावे लागेल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी. नितीन गडकरी यांनी हाच मार्ग अवलंबून कॅलरीज कमी केल्या आणि तब्बल ४५ वजन किलो कमी केले.
नितीन गडकरी यांचे आधी १३५ किलो वजन होते. पण आता त्यांचे ८९ किलो वजन आहे. गडकरींनी याबाबत स्वत:च एक खुलासा केला आहे. ते खाण्याचे प्रचंड शौकीन आहे. असे असतानाही नितीन गडकरी यांनी ४५ किलो वजन कमी केले आहे. मी आजही सर्वकाही खातो पण त्यांचे प्रमाण कमी केले आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
माझे वजन १३५ किलो होते. ते आता ८९ वर आले आहे. मी सव्वातास व्यायाम आणि प्राणायम करतो. मी कुठल्याही परिस्थितीत प्राणायम मिस करत नाही. त्यामुळेच माझी इम्युनिटी चांगली आहे. आपल्या हेल्थकडे आपण कायम लक्ष दिले पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
प्राणायम आणि व्यायाम करुन शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होते. तसेच नितीन गडकरी यांनी त्यांच्या जेवणाचे प्रमाणही जास्त कमी केलेले नाही. तसेच ते खाण्याचे शौकीन असल्यामुळे त्यांनी खाणेही थांबवले नाही. पण नियमित कॅलरीज कमी केल्यामुळे त्यांनी वजन कमी केले आहे.
प्रति किलो वजन कमी केल्यास आपण विकास कामांसाठी 1000 कोटी रुपये देऊ, असं चॅलेंज नितीन गडकरी यांनी दिलं होतं. नितीन गडकरी यांचं हे चॅलेंज मध्य प्रदेशमधील एका खासदाराने स्वीकारलं आहे.
जून महिन्यात गडकरी यांनी व्यासपीठावरून अनिल फिरोजिया यांनी कमी केलेल्या प्रत्येक किलो वजनावर आपण विकास कामांसाठी 1000 कोटी रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. फिरोजिया यांनी म्हंटलं आहे की, गडकरी यांनी दिलेल आव्हान मी स्वीकारले आणि 32 किलो वजन कमी केले.’
तसेच आता मी आणखी वजन कमी करणार आणि त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आणखी निधी देण्यास सांगणार असल्याच फिरोजिया यांनी स्पष्टच सांगितलं. याचबरोबर गडकरी यांनी देखील शब्द पाळला आहे. चॅलेंज दिल्याप्रमाणे, गडकरी यांनी विकासकामांसाठी निधी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना फिरोजिया यांनी सांगितलं की, ‘मी वजन कमी केल्यानंतर, गडकरी यांना भेटलो आणि त्यांच्यासोबत यासंदर्भात बोललो. ते अत्यंत आनंदी झाले. आश्वासन म्हणून त्यांनी उज्जेनसाठी 2300 कोटी रुपयांच्या विकास कामांनाही मंजुरी दिली आहे.’
महत्वाच्या बातम्या-
शाहरुखच्या ‘बेशरम’ गाण्यात दीपिकाने भगवे कपडे घातल्याने भाजप नेता नाराज; म्हणाला, बहिष्कार टाकला पाहिजे
सुशांतच्या चाहत्यांनी सुरू केला बॉयकॉट पठाणचा ट्रेंड, म्हणाले, आमिरचा घमंड तोडला, आता शाहरुखची वेळ
sushma andhare : सुषमा अंधारेंचे लोंटागण! जाहीरपणे मागीतली वारकऱ्यांची माफी; वाचा नेमकं घडलं तरी काय…