नितीन गडकरी म्हणतात.. ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे योग्यच कारण..’

 

नवी दिल्ली | देशात सध्या भारत-चीन बॉर्डरच्या प्रश्नावरून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच गलवान खोऱ्यात भारताचे जवान शहिद झाले आहे. यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी देशातील जनतेने केली आहे.

आता चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीला केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनीही समर्थन केले आहे.

देशातील काही नियम हे जुने झाले आहेत, त्यामुळे चिनी कंपन्यांना मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित समोर ठेऊन निर्णय घेतला पाहिजे.

त्यामुळे भारतीय कंपन्यांना फायदा होयला पाहिजे, असे म्हणत नितीन गडकरी यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीला समर्थन केले आहे.

सध्या भारतीय उद्योग आणि व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच चिनी कंपन्यांना देशातील विविध योजनेचा लाभ घेण्यास भारत परवानगी देणार नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.